मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

'या' खातेदारांना सर्व पैसे काढायची मुभा मिळाली

पीएमसी बँक खातेदारांपैकी जवळपास ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत दिली. ताब्यात घेतलेल्या प्रमोटर्सच्या मालमत्ता आर बी आयला दिल्या जातील. त्या मालमत्तांच्या लिलावातून आलेले पैसे खातेधारकांना दिले जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
 
 दरम्यान, पैसे काढण्यास बंदी असल्याने अनेकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. आपले पैसे बँकेत अडल्याचे समजाताच अनेकांना धक्का बसला होता. काहींना धक्का सहन न झाल्याने बँक खातेधारकांचा मृत्यू झाला होता. तर काहींना शाळा, महाविद्यालयाचे शुल्कही भरता आले नव्हते. तर काहींनी दागिणे विकून आपला घर खर्च चालवला होता.