1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 28 मे 2023 (16:49 IST)

1 जूनपासून होणार हे तीन मोठे बदल, या गोष्टी महागणार

money
Big changes from June 1 :प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्त्वाचे बदल केले जातात, जे थेट पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे या बदलांची जाणीव असणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून असे महत्त्वाचे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या बजेटवर आणि खिशावर होणार आहे. या बदलांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतींसारखे काही महत्त्वाचे बदलही समाविष्ट आहेत.
 
मे महिना नुकताच संपत आला आहे. जून महिन्याच्या 1 तारखे पासून काही बदल होणार आहे. ज्याचा आपल्या बजेटवर थेट परिणाम होणार आहे. हे बदल कोणते आहे जाणून घेऊया. 
 
1 एलपीजी सिलेंडरची किंमत- 
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात. सरकारी तेल, पेट्रोलियम आणि गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किमतीत बदल करतात. या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात. सरकारी गॅस कंपन्यांकडून एप्रिल आणि मे महिन्यात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात करण्यात आली. मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडर मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता 1 जून रोजी सिलिंडरच्या दरात काय बदल होतात हे पाहावे लागणार. 
 
 2 इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किमतीत बदल- 
जून महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किमतीत मोठा बदल होऊ शकतो. सध्या इलेक्ट्रिक टू व्हीलर वर सरकार कडून दिले जाणारे अनुदान कमी करण्यात आले आहे. या पूर्वी हे अनुदान 15 हजार रुपये प्रति किलोवॅट तास होती. ती कमी करून 10 हजार रुपये  करण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकी घेणे महागात पडू शकते.
 
3 सीएनजी -पीएनजीच्या किमतीत बदल -
गॅस सिलिंडर प्रमाणे सीएनजी -पीएनजीच्या किमती बदलतात एप्रिल महिन्यात दिल्ली आणि मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्यात आल्या आहे. मे महिन्यात कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत जून महिन्यात सीएनजी -पीएनजीच्या किमतीत मोठा बदल होऊ शकतो की नाही हे पाहावे लागणार. 
 
Edited by - Priya Dixit