गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (11:07 IST)

3 महिन्यात टोलनाके बंद होणार?

एक मोठी बातमी म्हणजे येत्या तीन महिन्यात देशातील सर्व टोलनाके पूर्णपणे बंद केले जातील. आता प्रत्येक गाडी मध्ये जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आणि त्या आधारे आता टोलची वसुली केली जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. 
 
नितीन गडकरी म्हणाले की, याआधीच्या काँग्रेस सरकारने अनेक ठिकाणी अन्याय पद्धतीने टोलनाके बसविले ज्यामुळे चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. आम्ही येत्या तीन महिन्यात सर्व टोलनाके बंद करणार असून टोलवसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. त्यांनी म्हटले की आम्ही प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस ट्रॅकर प्रणाली बसविणार आहे. ज्यामुळे जेवढा प्रवास केला जाईल तेवढाच टोल आकारण्यात येईल. 
 
यापूर्वी डिसेंबर महिन्यात या योजनेची माहिती नितीन गडकरी यांनी दिली होती. या माहितीला दुजोरा देत आता येत्या तीन महिन्यात भारत टोलमुक्त होईल असे त्यांनी सांगितले.
 
या प्रकारे करेल काम
जीपीएस प्रणालीनुसार जेवढा प्रवास केला जाईल तेवढाच टोल भरावा लागेल. 
हा टोल तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून वजा केला जाणार आहे. 
टोलसाठी जीपीएस प्रणालीचे काम सुरु असून लवकरच ही जीपीएस सिस्टिम बाजारात येणार आहे.
रशियन सरकारच्या मदतीने जीपीएस सिस्टिम वर काम सुरू आहे. 
योजना अमलात आल्यानंतर दोन वर्षात भारत पूर्णपणे टोलमुक्त होईल. 
देशातील सर्व वाहने ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज असतील. 
सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टिम तंत्रज्ञान बसवण्यासाठी सरकार वेगाने काम करेल. 
जसं फास्ट टॅग अनिवार्य केलं तसेच ही जीपीएस सिस्टिम प्रत्येक कारसाठी अनिवार्य केलं जाईल.