Electric Scooter : गाजलेले टॉप १० इलेक्ट्रिक स्कूटर
ऑगस्ट २०२६ मध्ये भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत जोरदार वाढ दिसून आली. या महिन्यात एकूण १,८८,७१४ इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री झाली, जी ऑगस्ट २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या ८१,६८१ युनिट्सच्या तुलनेत १३१.०४% नी अधिक आहे. बजाज चेतकने ५२,२४८ युनिट्सच्या विक्रीसह २७.६९% बाजारपेठेतील हिस्सा मिळवत विक्रीत आघाडी घेतली.
टीव्हीएस आयक्यूब ४२,८८२ युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आली. बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब यांचा मिळून ५०.४१% बाजारहिस्सा होता. चेतकची विक्री ऑगस्ट २०२५ मधील १४,०१४ युनिट्सवरून या वर्षी ५२,२४८ युनिट्सपर्यंत वाढली, जी मागील वर्षाच्या तुलनेत २७२.८३% वाढ दर्शवते.
टीव्हीएस आयक्यूबची (TVS iQube) विक्री देखील ऑगस्ट २०२५ मधील २४,४३४ युनिट्सवरून वाढून ४२,८८२ युनिट्स झाली. यात वार्षिक ७५.५०% वाढ नोंदवली गेली. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील विक्रीतील फरक ९,३६६ युनिट्सचा होता. हीरो विडा (Hero Vida) २५,५५८ युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या स्थानावर होती. गेल्या वर्षी याच महिन्यात विडाची १२,२७३ युनिट्सची विक्री झाली होती, म्हणजेच विक्रीत १०८.२५% वाढ झाली आहे. अथर रिझता (Ather Rizta) २२,५८६ युनिट्ससह चौथ्या स्थानावर होती आणि तिच्या विक्रीत ३०.२२% वाढ नोंदवली गेली.
पहिल्या चार इलेक्ट्रिक स्कूटरची एकूण विक्री १,४३,२७४ युनिट्सवर पोहोचली, म्हणजेच ऑगस्ट महिन्यात एकूण इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत या चार मॉडेल्सचा वाटा ७५.९२% होता.
ऑगस्ट २०२६ मधील सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर्स
ऑगस्ट २०२६ मधील मॉडेलनुसार इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री (युनिट्समध्ये). टीव्हीएस ऑर्बिटर १४,६४१ युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या क्रमांकावर असून, तिचा बाजारातील वाटा ७.७६% आहे. अॅम्पीअर मॅग्नस ९,७७२ युनिट्सच्या विक्रीसह सहाव्या क्रमांकावर असून, तिच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत ९८.४६% वाढ नोंदवली गेली आहे.
एथर ४५० ६,८९१ युनिट्ससह सातव्या क्रमांकावर, तर रिव्हर इंडी ६,५६७ युनिट्ससह आठव्या क्रमांकावर आली. गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या २,२२९ युनिट्सच्या तुलनेत रिव्हर इंडीच्या विक्रीत १९४.६२% वाढ झाली.
अँपिअर रिओ १,९११ युनिट्सच्या विक्रीसह नवव्या स्थानावर होती आणि विक्रीत २७१.७९% वाढ झाली. होंडा क्यूसी१ १,९०२ युनिट्ससह दहाव्या स्थानावर होती. यानंतर, बजाज युलूच्या १,५०० युनिट्सची विक्री झाली. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी याच्या केवळ १५० युनिट्सची विक्री झाली होती, म्हणजेच वार्षिक आधारावर ९००% वाढ नोंदवली गेली. अँपिअर नेक्सस ७५६ युनिट्ससह १२व्या स्थानावर होती. पहिल्या १५ मध्ये, सुझुकी ई-ॲक्सेस ६६८ युनिट्ससह १३व्या स्थानावर, यामाहा इको६ ४७५ युनिट्ससह १४व्या स्थानावर आणि एथर कोनार्क २१७ युनिट्ससह १५व्या स्थानावर होती.
Edited By - Priya Dixit

