सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (20:39 IST)

अतिपावसामुळे सोयाबिन धोक्यात

अतिवृष्टीमुळे सोयाबिनचे मोठे नुकसान झाले असून सोयाबिनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटत आहे. महिनाभरापासून शहरासह तालुक्यात सतत पाऊस असून या पावसामुळे सोयाबीन कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील सोयाबिनच्या पिकात पाणी शिरले आहेत. काही ठिकाणी जमिनीसह पिके खरडून वाहून गेली आहे. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 54 हजार 877 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर 152 गावातील 69 हजार 269 शेतकरी बाधित झाल्याचे शासनाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
 
कायम दुष्काळी तालुके म्हणून नांदगाव, मालेगाव तालुक्यांना मागील दोन दिवसात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. फळबागांची पुरती वाट लागली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 54 हजार 877 हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. तर 7 हजार कोंबड्या मृत पावल्या असून 104 घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यातील पिकांचे झाले आहे.