Gold-Silver Price Today:सोन्याच्या किंमतीत थोडी चढ , चांदीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या आजचा दर
Gold Rate Silver Price Today 27 September 2021: भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये चढ -उतार सुरूच आहेत. आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली, तर चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) च्या मते, 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत 4 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर, 999 शुद्धतेच्या चांदीनेही 177 रुपये प्रति किलोची घट नोंदवली.