सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : रविवार, 26 सप्टेंबर 2021 (13:29 IST)

महिंद्राची XUV700 SUV 7-सीटर व्हर्जनमध्ये लवकरच येत आहे,किंमत जाणून घ्या

महिंद्रा अँड महिंद्रा ने गेल्या महिन्यात आपली 5 आसनी SUV XUV700 लाँच केली. त्याचवेळी कारची किंमतही जाहीर करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये ही कार MG Hector,Tata Harrier, Tata Safari, Hyundai Creta आणि Kia Seltos यांच्याशी स्पर्धा करेल. या एसयूव्हीची 7 सीटर आवृत्ती देखील उपलब्ध असेल ज्याची किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.नुकत्याच लीक झालेल्या एका डॉक्युमेंट मुळे 7 सीटर XUV700 ची किंमत उघड झाली आहे. 
 
एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये येते.यात 2.0-लिटर, चार -सिलिंडर, mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन आहे जे 200hp आणि 380Nm पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन 2.2-लिटर, चार-सिलेंडर mHawk टर्बोचार्ज्ड डिझेल आहे.जे 185 hp पर्यंत पॉवर आणि 420 Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते.दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह येतात. 
 
माहितीनुसार, XUV700 SUV एकूण 29 व्हेरियंट मध्ये येईल. 5 सीटरचे 13 व्हेरिएंट आणि 7 सीटर मॉडेलचे 16 व्हेरिएंट असतील. 7 सीटर व्हेरिएंटच्या किंमती 13.19 लाख रुपयांपासून 20.69 लाख रुपयांपर्यंत (सर्व किमती एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होतील.