Yamaha R2 २७ तारखेला लाँच होणार यामाहाची दमदार बाईक ; १०,००० रुपयांत बुकिंग सुरू.
Yamaha R2 : यामाहा २७ ऑगस्ट रोजी आपली नवीन स्पोर्ट्स बाइक R2 अधिकृतपणे लाँच करणार आहे. कंपनीने लाँच होण्यापूर्वीच याचे बुकिंग सुरू केले आहे. ज्यांना ही बाइक खरेदी करायची आहे, ते १०,००० रुपये देऊन ऑनलाइन किंवा डीलरशिपवर जाऊन बुकिंग करू शकतात. चला, या बाइकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
यामाहाने लाँचिंगपूर्वीच आपल्या Yamaha R2 या स्पोर्ट्स बाइकचे प्री-बुकिंग अधिकृतपणे सुरू केले आहे. तुम्ही अवघ्या ₹१०,००० च्या टोकन रकमेत ही भन्नाट बाइक बुक करू शकता. ही बाइक २७ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच होईल. लाँच झाल्यानंतर बाजारात यामाहा R2 ची थेट स्पर्धा हिरो करिझ्मा XMR आणि केटीएम आरसी २०० (KTM RC 200) सारख्या २०००cc सेगमेंटमधील धडाकेबाज बाइक्सशी असेल. चला, याच्या फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
R15 पेक्षा किती वेगळी असेल R2?
ही नवीन R2 बाइक भारतात खूप लोकप्रिय असलेल्या Yamaha R15 प्रमाणेच वेगवान आणि स्पोर्टी रायडिंग अनुभव देणारी असेल.
नवीन इंजिन: यामध्ये R15 पेक्षा जास्त क्षमतेचे सिंगल-सिलिंडर इंजिन मिळेल.
इंजिन क्षमता: याबाबत अचूक माहिती अजून समोर आलेली नाही, परंतु यामध्ये २००cc ते २२०cc दरम्यानचे इंजिन असण्याची शक्यता आहे.
पावर: ही बाइक जवळपास २५hp ची पॉवर जनरेट करू शकते.
हलक्या बॉडीमुळे मिळेल जबरदस्त वेग
स्पोर्ट्स बाइक्स त्यांच्या शानदार लूक आणि डिझाइनसाठी ओळखल्या जातात. R2 च्या बाबतीतही हेच पाहायला मिळेल. सोबतच याचे वजनही कमी असू शकते. वजन कमी असल्याने ही बाइक वळणावर सहज वळेल आणि तिचा 'पावर-टू-वेट रेशिओ' उत्तम असेल, ज्यामुळे तिला जबरदस्त वेग मिळेल. KTM RC 200 चे वजन १६० किलोग्रॅम आणि Hero Karizma XMR चे वजन १६३.५ किलोग्रॅम आहे. यामाहा R2 या दोन्ही बाइक्सपेक्षा बरीच हलकी असेल मानले जात आहे.
R15 मॉडेलमध्ये बदल होणार, M व्हेरियंट बंद होऊ शकते
यामाहा R2 आल्यामुळे R15 बंद होणार नाही. मात्र, R2 साठी रस्ता मोकळा करण्यासाठी कंपनी R15 लाइन-अपमध्ये थोडे बदल करेल. असे मानले जात आहे की R15 चे सर्वात महागडे व्हेरियंट R15 M आणि जुन्या मॉडेलवर आधारित R15 S चे प्रोडक्शन बंद केले जाऊ शकते.
किंमत किती असू शकते?
सध्या R15 ची किंमत ₹१.५७ लाखांपासून सुरू होऊन ₹१.९८ लाखांपर्यंत जाते. अशा परिस्थितीत नवीन Yamaha R2 ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत ₹२ लाख ते ₹२.२० लाखांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. ही पूर्णपणे 'मेड इन इंडिया' बाइक असेल, जी भारतातून इतर देशांमध्येही एक्सपोर्ट केली जाईल.
बुकिंग आणि रिफंडशी संबंधित महत्त्वाची माहिती
टोकन रक्कम: ही बाइक ₹१०,००० देऊन ऑनलाइन किंवा डीलरशिपवर जाऊन बुक केली जाऊ शकते.
रिफंड पॉलिसी: ही बुकिंगची रक्कम पूर्णपणे रिफंडेबल (परत मिळण्याजोगी) आहे. जर तुम्ही बुकिंग कॅन्सल केले, तर ५ सप्टेंबरनंतर तुमचे पैसे परत मिळतील.
डिलीव्हरीमध्ये प्राधान्य: जे ग्राहक लाँच होण्यापूर्वी बुकिंग करतील, त्यांना बाइकची डिलिव्हरी आधी दिली जाईल.
