रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (13:19 IST)

शॉर्ट्सची सुरुवात करणारे नील मोहन युट्यूबचे नवे सीईओ, असा आहे प्रवास...

नऊ वर्षं युट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या सुझन वोजित्स्की यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. भारतीय वंशाचे नील मोहन त्यांचे उत्तराधिकारी असतील.
 
नील मोहन आता या व्हीडिओ प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
 
54 वर्षांच्या सुझन यांचं म्हणणं आहे की त्या आता आपल्या कुटुंबाकडे, आरोग्याकडे आणि खाजगी आयुष्याकडे लक्ष देऊ इच्छितात आणि म्हणूनच त्या या पदावरून राजीनामा देत आहेत.
 
त्या म्हणाल्या, की नऊ वर्षांपूर्वी त्यांनी जेव्हा युट्यूबमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी एक उत्तम नेतृत्वगुण असलेला संघ तयार केला होता. नील मोहन याच टीमचा भाग होते.
 
सुझन यांची जागा घेणारे नील मोहन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे स्नातक आहेत. त्यांनी या विद्यापीठातून इलेट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. याआधी त्यांनी गुगलमध्ये चीफ प्रोडक्ट ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे.
 
त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्येही काम केलं आहे आणि बायो-टेक्नोलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या 23 एंडमी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्येही होते.
 
सुझन वोजित्स्की यांनी काय म्हटलं?
सुझन यांनी 16 फेब्रुवारीला लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की आता बाजूला होण्याची योग्य वेळ आहे. कारण आता युट्यूबची कमान सांभाळण्यासाठी उत्तम नेतृत्व उपलब्ध आहे.
 
त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं, “25 वर्षांपूर्वी जेव्हा गुगल एका गॅरेजमध्ये बनलं होतं तेव्हापासून मी याचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांना ओळखते. यानंतर मी गुगलमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
 
हा निर्णय ‘माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला’ निर्णय होता असं त्यांनी म्हटलं.
 
सुझन यांनी कॅलिफोर्नियाच्या मॅनलो पार्कमध्ये असलेल्या आपल्या वडिलांच्या घराचं गॅरेज लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांना 1700 डॉलर्स महिना या दरावर भाड्याने दिलं होतं.
 
गुगलचं सर्च इंजिन याच गॅरेजमध्ये बनलं होतं. एका वर्षानंतर त्यांनी गुगलमध्ये काम करणं सुरू केलं. त्या अधिकृतरित्या गुगलच्या 16 व्या कर्मचारी होत्या.
 
सुझन लिहितात, त्यावेळी गुगलचा वापर फारसे लोक करत नव्हते आणि त्यातून काही उत्पन्नही येत नव्हतं. सुझन यांनी आपल्या कार्यकाळात गुगलच्या मार्केटिंग मॅनेजर, डबलक्लिकचं अधिग्रहण आणि अॅडसेन्सचं निर्मिती या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
2006 साली गुगलने 1.65 अब्ज डॉलर्सला युट्यूब विकत घेतलं. त्यानंतर 2014 साली सुझन युट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. नऊ वर्षांनंतर त्या आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत.
 
या राजीनाम्याबद्दल त्यांनी म्हटलं, “मी जवळपास 15 वर्षं नील मोहन यांच्यासोबत काम केलं आहे. मला आशा आहे की ते युट्यूबसाठी एक उत्तम नेते ठरतील. युट्यूब शॉर्ट्स, स्ट्रीमिंग, सबस्क्रिप्शन पासून ते आर्टिफिशयल इंटेलिजन्सपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींवर काम करतंय. येत्या काळात आणखी नवी आव्हानं समोर येतील आणि या आव्हानांचा सामना करण्यासाठी नील मोहन सर्वात योग्य व्यक्ती असतील.”
 
सुझन यांनी असंही म्हटलं की त्या नवा पदभार सांभाळण्यासाठी नील मोहन यांनी मदत करतील आणि सध्या काही इतर टीम्ससोबत काम करत राहातील.
 
कोण आहेत नील मोहन?
अमेरिकेत राहाणारे भारतीय वंशाने नील मोहन यांचा जन्म कुठे झाला याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
 
त्यांनी 1996 साली स्टॅनफर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. 2005 मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून एमबीए केलं. यानंतर 1996 साली त्यांनी टेक्नोलॉजी कंपनी एक्सेन्चरमध्ये सीनियर अॅनालिस्ट म्हणून काम केलं.
 
यानंतर त्यांनी काही काळ मायक्रोसॉफ्ट आणि मग पाच वर्षं डबलक्लिकमध्ये काम केलं.
 
2008 मध्ये नील मोहन यांनी गुगल जॉईन केलं. त्यावेळी गुगल डबलक्लिक कंपनीचं अधिग्रहण करत होती.
 
यानंतर त्यांनी गुगल डिस्प्ले आणि व्हीडिओ अॅड्सचे सीनियर व्हाईस प्रेसिडंट बनले. 2015 पासून ते युट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर म्हणून काम करत होते.
 
नील मोहन बायो-टेक्नोलॉजी क्षेत्रात काम करणारी कंपनी 23 एंडमी आणि कपडे बनवणारी कंपनी स्टिच फिक्स या कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्येही आहेत.
 
23 एंडमी सुझन वोजित्स्की यांची बहीण अॅन वोजित्स्की यांची कंपनी आहे जी सन 2006 मध्ये बनली होती. अॅन वोजित्स्की गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन यांची माजी पत्नी आहे. स्टिच फिक्स कॅटरिना लेक यांची कंपनी आहे जी त्यांनी 2011 साली बनवली होती.
 
नील मोहन यांनी युट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर या पदावर असताना 2021 मध्ये छोट्या व्हर्टिकल व्हीडिओजची सुरुवात केली होती. यांना शॉर्ट्स असं नाव दिलं. शॉर्ट्स प्रसिद्ध व्हीडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकशी स्पर्धा करायला काढलं होतं.
 
याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं होतं, “या व्हीडिओची प्रेरणा मला युट्यूबवर टाकलेला सर्वात पहिला व्हीडिओ ‘मी अॅट द झू’ (मी प्राणीसंग्रहायलात...) वरून मिळाली होती. या व्हीडिओ फक्त 18 सेकंदांचा व्हीडिओ होता. यात सॅन डिएगोच्या एका प्राणीसंग्रहालयाबद्दल माहिती दिली होती.
 
त्यांनी म्हटलं होतं, “तो काळ आणि आजचा काळ यात सर्वात मोठा फरक मोबाईल फोनचा आहे. मोबाईल फोनमुळे तुमच्या हातात उत्तम कॅमेरे आणि एडिटिंगची ताकद आली आहे. जर 15 वर्षांपूर्वी बनवलेला हा व्हीडिओ आज बनवला गेला असता तर तो मोबाईल फोनवरच असता आणि तो आडवा नसता तर मोबाईल व्हीडिओ असतात त्याप्रमाणे उभा असता. माझ्या टीमने शॉर्ट्समध्ये हेच करण्याचा प्रयत्न केला.”
 
भारतीय वंशाचे लोक मुख्य पदावर असणाऱ्या टेक कंपन्या –
युट्यूब - नील मोहन, सीईओ
मायक्रोसॉफ्ट – सत्या नडेला, 2014 मध्ये ते कंपनीचे सीईओ बनले आणि 2021 मध्ये एक्झिक्युटिव्ह चेअरमन
अडोब - शंतनू नाराण, 2007 साली सीईओ बनले आणि 2017 साली चेअरमन
अल्फाबेट (गुगल)– सुंदर पिचाई, 2007 साली गुगलचे आणि 2019 साली अल्फाबेटचे सीईओ बनले
आयबीएम – अरविंद कृष्णा, 2020 मध्ये सीईओ बनले आणि 2021 मध्ये चेअरमन
विमीओ – अंजली सूद, 2021 मध्ये सीईओ बनल्या
पेप्सीको – इंद्रा नुयी, 12 वर्षं सीईओ या पदावर राहून त्यांनी 2018 साली राजीमाना दिला
आईबीएम - अरविंद कृष्णा (2020 में सीईओ बने, फिर 2021 में कंपनी के चेयरमैन बने)
ट्विटर – पराग अग्रवाल 2021 साली सीईओ बनले. इलोन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला
मायक्रॉन टेक्नोलॉजी – संजय मेहरोत्रा, 2017 साली कंपनीचे सीईओ बनले. याआधी ते सॅनडिस्कचे सीईओ होते.