शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (13:34 IST)

Google India Layoffs गुगल इंडियाकडून कर्मचारी कपात, सुंदर पिचाई यांनी जबाबदारी घेतली

गुगल इंडियाने कंपनीच्या विविध विभागांतील 453 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे नोकरीतून काढून टाकल्याची माहिती देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गुरुवारी रात्री उशिरा ही छाटणी करण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांना लेऑफ मेल पाठवला आहे.
 
गेल्या महिन्यातच गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने सांगितले होते की ती आपल्या जागतिक मनुष्यबळाच्या सुमारे 6 टक्के म्हणजेच सुमारे 12000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल. सध्या हे स्पष्ट नाही की 453 लोकांची ही छाटणी 12,000 कामगारांच्या आधी घोषित केलेल्या छाटणीचा भाग आहे की येत्या काही दिवसांत आणखी छाटणी स्वतंत्रपणे केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांचा मेसेजही लेऑफ मेलसोबत आहे. ज्यामध्ये त्यांनी कंपनीत होणाऱ्या टाळेबंदीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.