1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

आता SMS ही स्वस्त होणार?

'एक पैसे दर सेकंद' ही योजना अनेक कंपन्यांनी लॉंच केल्यानंतर मोबाईलवर बोलणे स्वस्त झाले असून, आता मोबाईल एसएमएसचे दरही या कंपन्यांनी कमी करावेत असे निर्देश दूरसंचार मंत्री ए राजा यांनी दिले आहेत.

कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेने ग्राहकांना चांगलाच फायदा होत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कॉल दरात कपात केल्याने मोबाईलवरून बोलणे स्वस्त झाले आहे. आता या कंपन्यांनी आपल्या एसएमएस दरात कपात करण्याची गरज असल्याचे राजा यांनी म्हटले आहे.

टाटा डोकोमोने सर्वात प्रथम ग्राहकांसाठी एक पैसे दर सेकंद असे कॉल आकारण्याची योजना आणल्यानंतर देशातील सर्वच कंपन्यांनी ही योजना लॉंच केली आहे. कंपन्यांच्या या स्पर्धेचा फायदा मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना होत आहे.