1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

आस्पीचे भारती एअरटेलवर आरोप

WD
WD
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारती एअरटेल सारख्या कंपन्या आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली छोट्या कंपन्यांना बाजारातून हद्दपार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सीडीएमए ऑपरेटर संघ आस्पीने केला आहे.

यापूर्वी भारतीने अशा कंपन्या विरोधात ट्रायकडे तक्रार केली होती. आता आस्पीनेच भारतीवर आरोप केले असून, भारती बाजारातील छोट्या कंपन्यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

भारती आपल्या नेटवर्कसाठी 17 टक्के 60 पैसे प्रती मिनिट ऐवजी 50 पैसे प्रती मिनिटांची सवलत देत आहे. आउटगोइंग कॉल्सवरही कंपनीने अशाच प्रकारची सूट दिल्याने बाजारातील छोट्या कंपन्यांच्या ग्राहकांवर त्याचा परिणाम होत असल्याचे आस्पीने म्हटले आहे.