1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

इराण गॅस पाईपलाईन, भारताऐवजी चीन?

भारत-पाकिस्तान-इराणदरम्यान होवू घातलेल्या गॅस पाईपलाईनला आता चीनकडे वळवण्यात येणार असून, भारताने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा भारताऐवजी चीनचा समावेश या योजनेत करण्यात येईल असा इशारा इराणने दिला आहे.

2007 पासून हे प्रकरण रखडले आहे. भारत-पाक-इराणदरम्यान होणाऱ्या गॅस पाईपलाईनवर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी यापूर्वीच स्वाक्षरी केली आहे.

पाकमधून जाणाऱ्या पाईपलाईनच्या ट्रांजिट ‍किमतीवर तोडगा काढण्याची मागणी भारताने केली असल्याने याचे काम रखडले आहे. भारतातील इराणी राजदूतांनी आता या प्रकरणी भारताला इशारा दिला असून, भारताने लवकरात-लवकर निर्णय न घेतल्यास चीनकडे यासाठी विचारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा