एअर इंडियाने खर्चात कपात करावी- पटेल
एअर इंडियाला सशर्थ मदत केली जाणार आहे. यापूर्वी कंपनीने आपल्या खर्चात कपात करत आपल्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना नागरिक उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.
कंपनीच्या वैमानिकांनी आपल्या पीएलआर भत्त्यात कपात केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून संप पुकारला होता. बुधवारी वैमानिकांनी आपला संप मागे घेतला.
केंद्र सरकारने कंपनीत पाच हजार कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून, कंपनीला सशर्थ मदत करण्यात येणार असल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे.
मागील आणि चालू वर्षातील आकडेवारी पाहता कंपनीला 7,200 कोटीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.