एअरसेलची 'ओल्डेज होम' योजना
वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी-आजोबांनाही आता चांगले मोबाईल मिळणार आहेत. हेल्पेज इंडिया आणि दूरसंचार कंपनी एअरसेलने 'ओल्डेज होम' ही योजना सुरू केली असून, जुना मोबाईल वृद्धाश्रमातील या आजी-आजोबांना दान करण्याचे आवाहन कंपन्यांनी या योजनेद्वारे केले आहे.
एअरसेलने यासाठी देशातील विविध शॉपिंग मॉल्स, क्लब तसेच वर्दळीच्या ठिकाणी ड्रॉप बॉक्स ठेवले असून, ज्यांना आपले जुने मोबाईल अशा वृद्धांना दान करायचे आहेत, त्यांनी यात मोबाईल टाकण्याचे आवाहन कंपन्यांनी केले आहे.
कंपनी जमा झालेल्या हँडसेटची चौकशी करून वृद्धाश्रमात हे मोबाईल वाटणार आहे. हेल्पेज इंडिया या कामात कंपनीला मदत करणार आहे.