1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

कच्चे तेल 74 डॉलरवर

अमेरिकी तेल साठ्यात घसरण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 74 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे. अमेरिकी पेट्रोलियम इंस्टट्यूटने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील तेल साठ्यात मागील आठवड्यात 58 लाख बॅरलपर्यंत घसरण झाली आहे. यामुळे तेलाची मागणी वाढल्याने तेलाचे दर वधारले आहेत.

तेल बाजारात मागील दोन आठवड्यांपासून सातत्याने घसरण दिसून आली असून, अमेरिकेतील बाजारात कच्च्या तेलाचा वायदे बाजार 73.65 डॉलर प्रती बॅरलवर गेला आहे.