कच्चे तेल 80 डॉलरवर
डॉलरच्या किंमतींमध्ये घसरण सुरूच असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढतच आहेत. बाजारात कच्चे तेल 80 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे.
अंतर बँकिंग मुद्रा बाजारात अन्य मुद्रांच्या तुलनेत डॉलरमध्ये मागील 14 महिन्यांमधील सर्वात मोठी घसरण झाली असून, याचा फायदा तेल उत्पादकांना मिळत आहे.
बाजारात न्यूयॉर्क मर्केंटाइल एक्सचेंजमध्ये अमेरिकी क्रुड ऑइल 79.60 डॉलर प्रती बॅरलवर गेले. लंडन ब्रेंट तेल 8 सेंटने वाढत 77.85 डॉलर प्रती बॅरलवर गेले होते.
बाजारातील तेल तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ऑक्टोबरपासून तेलाच्या दरात आतापर्यंत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.