कृषी विकास दर घसरणार- पवार
कमी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने देशाचा कृषी विकास दर घसरण्याची शक्यता केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचे सांगतानाच खरीप पिकांचे नेमके किती नुकसान झाले हे सांगणे कठीण असल्याने विकास दर किती टक्के घसरणार हे सांगणे अवघड असल्याचे पवार म्हणाले.
साखर आणि तांदूळ यांचा तुटवडा पडू नये यासाठी सरकारने खास उपाययोजना केली असून, आगामी काळात सरकार गरज पडल्यास यांची कमी दरात विक्री करण्यावरही विचार करत असल्याची माहिती पवार यांनी दिली.