1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

चीनमध्ये बेरोजगारी वाढणार

चीनमध्ये चालू वर्षात बेरोजगारी दर 4.3 टक्क्यांवर जाण्याची शक्यता असून, मागील वर्षातील याच कालावधीत हेच दर 4.2 टक्के होते.

चीनचे मनुष्यबळ विकास मंत्री यीन वीमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार चीन मधील बेरोजगारी या वर्षात किंचित वाढणार असल्याची शक्यता आहे. सरकारने यासाठी खास उपाययोजना केल्या आहेत.

सरकारकडे आलेली आकडेवारी ही केवळ शहरी असून, ग्रामीण भागातील बेरोजगारी आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.