जपान एअरलाईन्स दिवाळखोरीत?
आर्थिक संकटात सापडलेल्या जपानी सरकारी विमान कंपनी जपान एअरलाईन्स कॉर्पोरेशन दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. कंपनीची आर्थिक पुनर्बांधणी करण्यात येणार असून, यापूर्वी कंपनीच्या दिवाळखोरीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
जपान मधील सरकारी संघटना एंटरप्रायजेस टर्नअराउंड इनिशेएटिव्ह कॉर्पोरेशन ऑफ जपान (इटीआयसी) ने कंपनीची परिस्थिती सुधारावी यासाठी कर्जदात्या बँकांशी चर्चा सुरू केली आहे.
कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर कंपनीची आर्थिक पुनर्बांधणी करणे गरजेचे असून, यासाठी कंपनीला दिवाळखोरी जाहीर करण्याची गरज असल्याचे इटीआयसीने स्पष्ट केले आहे. आर्थिक मंदीत सापडलेल्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत चालू वर्षात अर्ध्यावर आली आहे.