टोयोटा उत्पादनात कपात करणार
जागतिक आर्थिक मंदीमुळे गाड्यांची विक्री कमी झाल्याने टोयोटा मोटार कॉर्पोरेशनने आपल्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात उत्पादनात 10 टक्क्यांची कपात करण्यात येणार असून, दहा लाख वाहनांचे उत्पादन कमी करण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात जपानमधील एका प्रकल्पातील काम थांबवण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.