1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

तांदूळ आयात करणार नाही- पवार

WD
WD
देशातील गोदामात तांदूळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, केंद्र सरकार तांदूळ आयात करणार नसल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत तांदूळ उत्पादन 1.3 कोटी टनवर जाण्याची शक्यता पाहता सरकार तांदूळ आयात करण्यावर सरकारचा विचार सुरू असल्याचे बोलले जात होते. पवार यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.

एक डिसेंबर पर्यंत सरकारी गोदामात 229 लाख टन तांदळाचा साठा आहे. आगामी काळात पुरेल इतका हा तांदूळ असून, तूर्तास सरकार तांदूळ आयात करणार नसल्याचे पवार म्हणाले.

पंजाब आणि हरियाणाकडून यंदा मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी करण्यात आली असून, या दोन राज्यांकडून 22 डिसेंबर पर्यंत 110.50 लाख टन तांदूळ विकत घेण्यात आल्याचे पावर म्हणाले.