1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

पटेल यांचा एअर इंडियाला इशारा

कंपनीने आपली उधळपट्टी थांबवली आणि आगामी वर्षभरात बचत केली तरच केंद्र सरकार एअर इंडियामध्ये गुंतवणूक करेल असा इशारा केंद्रीय नागरिक उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे.

कंपनीला चालू वर्षात कोट्यवधीचा तोटा झाला असून, मागील दोन वर्षांपासून कंपनी तोट्यात आहे. या विषयावर मंत्री समूहाच्या बैठकीनंतर पटेल यांनी ही माहिती दिली.

कंपनीने आणि सरकारने आपल्या खर्चात कपात करणे गरजेचे असून, यानंतरच एअर इंडियाच्या इक्विटीत गुंतवणूक करणे शक्य असल्याचे ते म्हणाले.