पुन्हा मंदी येणार नाही- नोवोटनी
आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी अनेक युरोपियन देशांनी नानाविध उपाय योजले आहेत. या उपायांना यश मिळत असून, 2010 पर्यंत युरोपीय देशांची अर्थव्यवस्था पुन्हा स्थिरावेल असे मत युरोपियन केंद्रीय बँकेच्या संचलन समितीचे सदस्य इ नोवोटनी यांनी व्यक्त केले आहे.
यापुढील काळात पुन्हा आर्थिक मंदीचा सामना करावा लागण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. युरोपीय देशांनी आता मंदीतून धडा घेत उपाययोजना करणे गरजेचे असून, आर्थिक पॅकेजची आक्रमक घोषणा करतानाही काळजी घेणे गरजेचे असल्याचे नोवोटनी म्हणाले.