1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

भारतात 50 कोटी फोनधारक

मोबाईलचा वेगाने प्रसार होत असल्याने भारतातही फोन धारकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आज घडीला 50 कोटी जनतेकडे फोन असून, आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता आहे.

2010 पर्यंत देशात 50 कोटी जनतेकडे फोन उपलब्ध असतील असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु 15 महिन्यांपूर्वीच देशात 50 कोटी जनतेकडे फोन उपलब्ध झाले आहेत.

ट्रायने दिलेल्या माहितीनुसार देशात 40.31 कोटी जनतेकडे मोबाईल फोन असून, एकट्या ऑगस्ट महिन्यात विविध कंपन्यांनी 1.51 कोटी नवीन कनेक्शन दिले आहेत. मोबाईल वापरात चीन नंतर भारताचा नंबर लागतो. चीनमध्ये 60 कोटी जनतेकडे मोबाईल आहे.