1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

मसाल्याची निर्यात वाढली

जागतिक आर्थिक मंदीमुळे भारतीय उत्पादनांच्या मागणीत घसरण झाली असली तरी निर्यात क्षेत्राला मात्र मसाल्यांनी आधार दिला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतीय मसाल्यांची मागणी तीन टक्क्यांनी वाढली आहे.

चालू वर्षातील ऑगस्ट महिन्यात 34025 टन मसाल्याची निर्यात करण्यात आली. मागील वर्षात याच कालावधीत 32880 टन मसाल्यांची निर्यात करण्यात आली होती.

टक्केवारीचा विचार करता निर्यात वाढवणारे आकडे दिसत असले तरी रुपयांच्या तुलनेत मात्र यात 7.7 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मागील वर्षात ऑगस्ट महिन्यात 391.11 कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली होती. चालू वर्षात 387.97 कोटीची निर्यात करण्यात आली आहे.