1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

मारुतीची उरणार केवळ आठवण

केंद्र सरकारने नवीन पर्यावरण नियम जाहीर केल्यानंतर मारुती सुझुकीने मारुती-800 आणि झेन या आपल्या दोन लोकप्रिय उत्पादनांना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या गाड्यांच्या केवळ आठवणीच चाहत्यांमध्ये उरणार आहेत.

2010 पासून या गाड्यांची विक्री थांबवण्यात येणार असल्याचे सांगतानाच 'बीएस फ्रो' नियम लागू नसलेल्या शहरांमध्ये या गाड्यांची जरी विक्री करण्यात येणार असली तरी या गाड्या इतिहास जमा होणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंजो नाकानिशी यांनी स्पष्ट केले आहे.

2015 पर्यंत संपूर्ण भारतात बीएस फ्रो नियम लागू करण्यात येणार असून, या नियमानुसार पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्यात येणार आहे.