1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

रामलिंग राजू यांना हार्टऍटॅक

सत्यम कॉम्प्युटर्सचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक रामलिंग राजू यांना हार्टऍटॅक आला असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजू यांना हैदराबादेतील इन्सेंटिव्ह केअर रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

चंचलगुडा येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या राजूंना अचानक छातीत कळ निघाल्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मागील आठ महिन्यांपासून ते कोठडीत आहेत. अब्जावधीच्या सत्यम घोटाळ्यात ते मुख्य आरोपी आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा