रिको ऑटोतील संप मिटला
रिको ऑटोच्या कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये एकमत झाल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
कंपनीने काही दिवसांपूर्वी 16 जणांना कामावरून काढले होते. त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे अशी मागणी कामगारांनी केली होती. व्यवस्थापनाने यास नकार दिला होता. यानंतर कामगार संघटनांनी संप पुकारला होता.
आता व्यवस्थापनाने 16 पैकी नऊ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची तयारी दर्शवल्याने कामगारांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.
संपामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अधिक वेळ काम करण्यास तयार असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले आहे.