1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सावधान नवीन संकट येतेय- HDFC

WD
WD
जागतिक अर्थव्यवस्थेला अस्थिर करणारे आणखी एक संकट येत असल्याचे स्पष्ट करत दुबईत आलेले संकट ही त्याची पहिली पायरी असल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.

दुबईतील या संकटाचा मोठा फटका देशातील आणि विदेशातील अनेक बँकांना बसण्याची शक्यता असून, हंगेरी, यूनान, आयरलँड यासारखे देश यात अडकण्याची शक्यता असल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

देशातील बाजारात वाढत्या विदेशी मुद्रा प्रवाहामुळे बाजारात उत्साह संचारला असला तरी दुबईतील हे संकट आगामी काळात मोठे वादळ ठरण्याची शक्यता बँकेने व्यक्त केली आहे.

मंदीला सुरुवात झाल्यानंतरच आपल्यावरील कर्ज फेडण्यात आपल्याला अपयश येणार असल्याचे दुबई वर्ल्डला कळले होते, परंतु कंपनीने मात्र याची आता घोषणा केल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.