आज अखेर सोन्याने 17 हजारांचा पल्ला गाठला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर धातूंच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ झाल्याने आज राजधानीतील बाजारात सोन्याने 17 हजारांचा टप्पा गाठला.
राजधानीत सोने 17 हजार रुपये दहा ग्रॅम इतके विकले गेले. सोन्याच्या दरात 165 रुपयांची वाढ झाल्याने सोने 17050 रुपयांवर गेले होते. चांदीच्या किंमतींमध्ये 200 रुपयांची वाढ झाल्याने चांदी 27500 रुपये प्रती किलोवर गेली आहे.
लंडनमध्ये सोने 1117.05 डॉलर प्रती औंसवर गेले होते. कालांतराने ते 1115.30 डॉलरवर आले. अमेरिकी वायदा बाजारात सोने 1.2 टक्क्यांनी वाढत 1115.80 डॉलर प्रती औंसवर गेले आहे.