शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. मनाचिये गुंती
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (11:44 IST)

यश एका दिवसात नाही

यश मिळवण्याचा मार्ग कधीही एका दिवसात दिसत नाही. त्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते आणि ते आपण करत असाल तर विजयाचा मार्ग निश्चित होतो.
 
आजकाल प्रत्येकाला त्वरित यश मिळवायचं असतं. तरुण पिढी नोकरी करायला लागून एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोवरच ते प्रमोशनची मागणी आणि अपेक्षा करायला लागतात. अशाच प्रकारे विार्थी परीक्षेच्या आधी केवळ दोन महिन्यांपासून अभ्यासाची पुस्तकं वाचायला लागतात आणि परीक्षेच्या निकालात त्यांना चांगले गुण अपेक्षित असतात. आपल्याही मनात तसं येत नसेल तर ते वास्तवात शक्य होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. आपल्याला पुढचं मार्गक्रमण करायचं असेल तर कोणतीही कामं न करता हळूहळू कार्यरत व्हायला हवं. एकाच दिवसात यश कधीही मिळत नाही. एखादं मोठं घर बनवण्यासाठी लहान आकाराच्या असंख्य विटांचा वापर करावा लागतो.त्यामध्ये यशाचा महाल तयार करायचा असेल तर त्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतील.
 
आज आपण यशस्वी व्यक्तीकडे पाहून त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. त्यानेही छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात करुन आज तो यशोशिखरावर पोहोचलेला असतो. एखादी व्यक्ती आपल्याला त्वरित यशस्वी बनवण्याचं किंवा आपली प्रगती त्वरित होईल अशी आश्वासनं देत असेल तर ती व्यक्ती आपल्यासाठी खोटारडेपणा करुन तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या. आपण यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करायला लागता त्यावेळी नंतर हे परिश्रमच यशाचा पाया ठरतात. मेहनत केल्याशिवाय यशाची पायाभरणी होत नाही आणि आपण आपलं उद्दिष्ट साध्य करु शकत नाही. एखादी टेकडी त्या जागेवरुन दूर करायची असेल तर तिच्या पायापासून सुरुवात करायला हवी. त्यामध्ये सुरुवातीला येणार्या अडचणी आपण दूर करु शकाल तर एक मोठं स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. ते करण्यासाठी आपल्यामनाला सातत्याने प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे.
 
असं करताना हे तू करु शकणार नाहीस असं कोणी म्हणत असेल तर घाबरुन जायचं कारण नाही तर आपण आत्मविश्वासानेकाम करत राहिलं पाहिजे. आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने रोज एक पाऊल उचललं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन काम पूर्ण करण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करता त्यावेळी आपण उत्साहित राहतो. काम करण्याची प्रेरणा वाढते. पुढे जाण्याचा उत्साह कायम असेल तर आपल्याला मिळणारा विजय निश्चित ठरतो.
सतीश जाधव