शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By
Last Modified: मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (16:11 IST)

जीसस क्राइस्ट यांचे अनमोल विचार

प्रभू येशू ख्रिस्त हे प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे. त्यांचे शब्द आणि संदेश प्रेमळ आहे. त्यांचे संदेश आपल्या मनात रुततात. ईश्र्वरामध्ये रमण्यासाठी येशू त्याग सेवेचं मार्ग निवडण्याचा संदेश देतात. त्यांच्या शिकवणी जीवनाला सकारात्मक दिशा देतात.
 
त्याचे काही अनमोल विचार आहे जे आत्मसात केल्याने जीवनात नैराश्य कधीच येत नाही.
येशू चे विचार :-
१ आपल्या पालकांचा नेहमी आदर करा.
२ आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करा. त्यांचाशी सालोख्याने, दयाळूतेने वागा.
३. कठोर परिश्रम करा.
४. आपल्या विरोधकांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा जे आपल्याला त्रास देतात.
५. गोर गरिबांना दान करा. जेणे करून आपल्याला स्वर्गात चांगली वागणूक मिळेल.
६. स्वतःला ओळखा स्वतःचे आत्मचिंतन करा.
७. मला स्वतात सामील करा. आपल्या जगात प्रवेश करु द्या.
८. संपन्न व्यक्तींना स्वर्गात प्रवेश वर्जित आहे.
९. मनुष्य प्राण्याने ईश्वराच्या आदेशानुसार काम केले पाहिजे.
१०. ज्याने कधी हीं पाप केले नाही अश्या व्यक्तीने प्रथम दगड उचलून मारलं पाहिजे.