शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 26 जून 2019 (17:36 IST)

सचिननंतर विराटने पटकावला क्रिकेटचा देव असल्याचा मान, या इंग्लिश क्रिकेटपटूने केलं कौतुक

टीम इंडियाच्या कर्णधार विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये आपल्या खेळ भावनेने चाहत्यांचे मन जिंकले आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथची हूटिंग करणाऱ्या दर्शकांना शांत केलं आणि मग पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अंपायरच्या निर्णयापूर्वीच पव्हेलियनकडे परतला. त्याने अनुभवलं की मोहम्मद अमीरचा चेंडू त्याच्या बॅटच्या कोपऱ्यावरून लागून विकेटकीपरच्या ग्लोव्हजमध्ये गेला आहे. इंग्लंडचा माजी ऑफस्पिनर ग्रीम स्वान कोहलीच्या अशा वर्तनाने खूप आश्वस्त झाला.
 
अलीकडेच 'स्‍वानी क्रिकेट शो' म्हणजेच आपल्या पोडकास्‍टमध्ये स्वान कोहलीच्या पाकिस्तानविरुद्ध पव्हेलियन परतणाऱ्या घटनेचा उल्लेख करत म्हणाला की हे सिद्ध करतं की भारतीय कर्णधार किती प्रामाणिक आहे आणि सहजपणे तो 'मॉडर्न एज जीसस' बनला आहे. उल्लेखनीय आहे की भारताच्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जातं आणि आता विराट कोहलीला (मॉडर्न एज जीसस) देखील एका प्रकारे सारखा मान मिळाला आहे.
 
स्‍वान म्हणाला की जो कोणी फलंदाज माहीत असून की तो आऊट आहे, पव्हेलियन नाही परततं, मला तसे लोक मुळीच आवडतं नाही. याविषयी माझा बऱ्याच वेळी फलंदाजांसह वाद झाला आहे. फलंदाज म्हणतो की अंपायर आपला निर्णय देणार, पण मला ते अप्रामाणिक वाटतं. तुमच्या बॅटच्या कोपर्‍या चेंडू लागून सुद्धा तुम्ही क्रीजवरच उभे आहात तर हे चांगले नाही. कारण आपल्याला माहीत आहे की आपण आऊट आहात. 
 
जर आपण अंपायरचा निर्णय ऐकण्याचं कारण देता तर मग आपण नक्कीच अप्रामाणिक वागत आहात. विराट पॅव्हेलियनला परतला आणि नंतर असं कळलं की त्याच्या बॅटचा कोपरा चेंडूला लागलाच नव्हता. यावरून आपण बघू शकतो की विराट हा एक अत्यंत प्रामाणिक क्रिकेटपटू आहे. त्याने आऊट नसतानाही स्वतःला आऊट ठरवलं. प्रामाणिकपणे ते आधुनिक काळाचे येशू आहेत.
 
टीम इंडिया यावेळी वर्ल्ड कप 2019 च्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पुढील सामना गुरुवारी वेस्ट इंडीजविरुद्ध मँचेस्टरमध्ये खेळला जाईल.