शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जानेवारी 2024 (14:21 IST)

नेहा पेंडसेच्या साडी मधल्या अनोख्या अदा

neha pendse
neha pendse
नेहा पेंडसेचे पाच मंत्रमुग्ध करणारे साडी लूक अभिनेत्री नेहा पेंडसे ही कायम तिच्या फॅशन साठी चर्चेत असते. वेस्टर्न पासून पारंपरिक लूक पर्यंत नेहा कायम फॅशनेबल अंदाजात बघायला मिळते. पारंपारिक विणकाम असो किंवा एखादी डिझायनर साडी असो ती कायम तिच्या लूक्स ने लक्ष वेधून घेते. शिफॉन ऑफ-व्हाइट फ्लोरल साडी आणि नेहाच सौंदर्य हे अफलातून आहे. सहा यार्ड सिम्फनी असलेल्या तिच्या लूक च करावं तितकं कौतुक कमीच आहे.  

पूर्ण बाह्यांच्या ब्लाउजसह शाई-निळ्या रंगाच्या साडीच्या ग्लॅमरमध्ये ती लक्षवेधी दिसतेय. लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे पारंपारिक महाराष्ट्रीयन नथ. 

एक्वा आणि सोन्याच्या रेशीम पोल्का-डॉटेड साडी मध्ये नेहा चा साडी लूक खास होतो. पोशाखाला पूरक नाजूक डायमंट कानातले, बांगड्या आणि अंगठी घालून हा लूक अजून खास करते. 

ती ब्राँझ-स्पॉटेड ब्रोकेड ब्लाउजसह सहजतेने गजराने सजलेल्या पारंपारिक बनमध्ये तिचे केस सुंदरपणे स्टाइल आहेत आणि अॅक्सेसरीज कमीत कमी ठेवून तिने सोनेरी झुमक्याने लूक पूर्ण केला आहे.

पारंपारिक लाल आणि पांढऱ्या गराड साडीमध्ये ती स्पॉटलाइट चोरताना दिसते.चोकर सेट आणि सोन्याच्या बांगड्या, सौंदर्य पसरवणाऱ्या या लूक मध्ये ती अगदीच सुंदर दिसते.

नेहाची फॅशन शैली ही नेहमीच चर्चेत असते आणि म्हणूनच फॅशनच्या क्षेत्रात ट्रेंडसेटर म्हणून तिला एक वेगळा दर्जा आहे.