बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (11:11 IST)

२६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार 'माझा अगडबम'

सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेल्या 'माझा अगडबम' हा सिनेमा दिवसागणिक चर्चेचा विषय ठरत आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अश्या चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आले. या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो. पण या दोघांबरोबरच आणखीन एक अगडबम व्यक्ती यात आपल्याला दिसून येत आहे. अश्या या दोन अगडबम व्यक्तींच्यामध्ये अडकलेला सुबोध भावे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
 
'माझा अगडबम' या सिनेमाचा हा पोस्टर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्सअंतर्गत या सिनेमाची प्रस्तुती होत असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.  टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. तसेच या सिनेमाच्या सहनिर्मात्यांच्या फळीत रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांचा समावेश आहे. बल्लू सलुजा यांनी या सिनेमाचे संकलन केले असून, मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर या मराठीतील आघाडीच्या गीतकारांच्या गाण्यांना टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. असा हा दर्जेदार कलाकृतीने नटलेला ‘माझा अगडबम’ सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खुमासदार मेजवानी ठरेल, यात शंका नाही.