संबंधित माहिती
- 'नथुरामजी यांनी सांगितलं होतं की गांधीजींनी हे राम म्हटलंच नव्हतं' - गुणरत्न सदावर्ते
- वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची : जयंत पाटील
- अमोल कोल्हेंनी सांगितले नथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्या मागचे कारण
- नवा वाद, अमोल कोल्हे नथुराम गोडसेची भूमिका साकारणार, अनेकांचा विरोध
- बिचुकले म्हणतो, म्हणून शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखा आहे
अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत
घायल, दामिनी, घातक, खाकी सारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहे.
टीझरच्या सुरुवातीलाच चिन्मय मांडलेकर म्हणजेच नथुराम गोडसे महात्मा गांधीं समोर येतो. हिंदू राष्ट्राला वाचवण्यासाठी तुमच्यासोबत विचारांचे युद्ध करणार असल्याचे तो सांगतो. तेव्हा महात्मा गांधी म्हणतात, विचारांच्या युद्धात हत्यार नाही तर विचारांचा वापर होतो. चित्रपटात ए आर रहमान (A R Rehman) यांनी म्युझिक दिले आहे ज्याची झलक टीझरमध्ये दिसते. गांधी गोडसे एक युद्ध चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणार हे नक्की. अभिनेते दीपक एंटनी (Deepak Antany) यांनी महात्मा गांधी यांची भुमिका साकारली आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor
