सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (20:55 IST)

नवा वाद, अमोल कोल्हे नथुराम गोडसेची भूमिका साकारणार, अनेकांचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या नथुराम गोडसेंच्या भूमिकेतील चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार अमोल कोल्हे या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारात असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. अमोल कोल्हेंचा या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. ३० जानेवारीला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रोमो प्रदर्शित होताच होणाऱ्या विरोधावर आताा अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही की तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही” असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.
 
अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, २०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.”असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले.