1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified बुधवार, 22 मार्च 2023 (18:19 IST)

अभिनेते सुनील तावडेंची लेक लग्नबंधनात

sunil tawde
Instagram
मराठी अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawade) यांची लेक अंकिता प्रवीण वारसह लग्नबंधनात अडकली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या होणाऱ्या जावयासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.  या सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. लेकीच्या लग्नात अभिनेते सुनील तावडे यांनी देखील जोरदार डांस केला.
 
अंकीता तावडे (Ankita Tawade) ही देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहे. ती स़्टार प्रवाह वाहिनीत निर्माती म्हणून काम करते. तर सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडेही अभिनेता आहे. त्याने नुकतेच रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमात भूमिका साकारली.  कालच अंकिताने तिच्या संगीत सोहळ्याचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचताना दिसत आहे.