1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (15:57 IST)

अभिनेता सुयश टिळकचा भीषण अपघात, स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याची दिली माहिती

Actor Suyash Tilak
अभिनेता सुयश टिळकचा भीषण अपघात झाला होता. सुयशने याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. सुयश टिळक 28 फेब्रुवारी रोजी आपली गाडी न घेता कॅबने प्रवास करत होता. तो ज्या कॅबने जात होता त्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला. रविवारी 28 फेब्रुवारी रोजी पहाटे कॅबने प्रवास करत होता. रस्त्यावर अंधार असल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या गाडीने सुयश ज्या कॅबने प्रवास करत होता. त्याला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, सुयशची कॅब रस्त्याच्या कडेला उलटून पडली होती. हा अपघात झाल्यानंतर रस्त्यावर फक्त चालक आणि सुयश असे दोघेच होते. ड्रायव्हर आणि सुयश, दोघांनाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. सुयश स्वतः कॅबबाहेर आला त्यानंतर त्याने ड्रायव्हरला देखील बाहेर काढलं. या दुर्घटनेत गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. 
 
यानंतर सुयशने स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याची माहिती दिली. 'देव दयाळू आहे व जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे', असे पोस्ट करीत सुयशने काळजी करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.