शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (08:59 IST)

अमृता फडणवीस यांनी गाणं पोस्ट करुन सगळ्या भाऊरायांना एक मागणं मागितलं

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट करुन सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं आहे. “भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या” असं म्हणत त्यांनी त्यांचं नवं गाणं ट्विट केलं आहे. फेसबुकवरही त्यांनी हे गाणं पोस्ट केलं आहे. 
 
अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं स्त्रियांना समर्पित केलं आहे. समाजात स्त्री भ्रूण हत्या होतात, स्त्रियांना नाकारलं जातं, त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जातं, त्यांच्यावर अत्याचार होतात हे सगळं टाळण्याचं आवाहन अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्यातून केलं आहे. समाज जागृतीच्या दृष्टीने त्यांनी त्यांचं नवं गाणं समोर आणलं आहे.
 
या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. काही नेटकऱ्यांनी हे गाणं आवडल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.