गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (20:42 IST)

अभिनेत्री लीना भागवत यांनी नवीन घरात गृहप्रवेश केला

फोटो साभार सोशल मीडिया(इंस्टाग्राम)सध्या सोशल मीडियामुळे जगात कुठे काय सुरु आहे ते समजते. सामान्य माणसांबरोबरच सेलिब्रिटी देखील सोशल मिडीया वापरतात आणि आपल्या काही गोष्टी चाहत्यांशी शेअर करतात.अलीकडे सेलिब्रिटी काय करत आहे, कुठे जातात, त्यांचे लग्न, गोडबातमी,आणि डोहाळे,डोहाळजेवण आणि बाळाच्या जन्मा पर्यंतची बातमी आपल्या चाहत्यांशी शेअर करतात. एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याने नवीन काही खरेदी केली मग ते वाहन असो किंवा मोठे घर असो आपला आनंद आपल्या चाहत्यांसह शेअर करतात आणि त्यांचे फोटो देखील शेअर करतात.

अभिनेत्री लीना भागवत आणि त्यांचे पती अभिनेता आणि दिग्दर्शक मंगेश कदम यांनी वयाच्या 48 व्या वर्षी आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तिने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे. नुकताच या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पडला आहे. लीना यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या मंगेश यांच्यासोबत त्यांच्या नवीन घरात आहेत. तर दुसऱ्या फोटोंमध्ये लीना दारावर कुंकुवाचे हात उमटवत आहेत. यासोबतच लीना यांनी त्यांच्या स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्या आणि मंगेश हातात करा घेऊन घरात प्रवेश करत आहेत.
लीना यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. नेटकरी प्रतिक्रिया देत या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत.हे जोडपे सध्या स्टार प्रवाह वरील मालिका ठिपक्यांची रांगोळी मध्ये काम करत आहे. मालिकेत लीना या सुवाआईच्या भूमिकेत ते मंगेश कदम हे विठूबाबाच्या भूमिकेत आहे. या मालिकेत देखील या दोघांनी पतिपत्नीची भूमिका साकारली आहे. त्यांची पहिली भेट एका लग्नाची दुसरी गोष्ट मधून झाली आणि नंतर दोघांनी लग्न केलं आणि आता त्यांनी नवीन घर खरेदी केलं असून गृहप्रवेश केला आणि त्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. त्यांचं दोघांचं स्वपन बऱ्याच वर्षा पासून घर घेण्याचं होत आणि त्यासाठी दोघांनी खूप कष्ट केले.अखेर त्यांचे स्वप्न आता पूर्ण झाले.
मंगेश यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. या वयात आपल्या स्वतःच्या घरात गृहप्रवेश करण्याचा आनंदच काही वेगळा आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.