शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:22 IST)

अंकुश चौधरीचा 'ट्रिपल सीट' 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

अभिनेता अंकुश चौधरी 'ट्रिपल सीट' घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. या चित्रपटात अंकुश शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटीलसोबत दिसणार आहे.  'वायरलेस प्रेमाची कहाणी' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.
 
अंकुश या सिनेमात कृष्णा सुर्वे या तरूणाची भूमिका साकारतो. कृष्णा या सिनेमात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काहीही करायला तयार असतो. आणि त्याच्या या काहीही करण्याची धम्माल या सिनेमात पाहायला मिळणार आहे. याशिवाय प्रवीण तरडे देखील या सिनेमातून भेटीला येत आहेत. संकेत पावसेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून नरेंद्र फिरोदिया यांची निर्मिती आहे. हा सिनेमा 24 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.