1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Ashok Saraf Lamborghini Video Viral

अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील 'कूल' अंदाज; AI व्हिडिओ सोशल मीडियावर उडवली खळबळ

ज्येष्ठ मराठी अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे अशोक मामा या व्हिडिओमध्ये भलत्याच 'कूल' आणि स्वॅग अवतारात दिसत आहेत.
 
व्हिडिओमध्ये नेमके काय आहे?
या व्हिडिओमध्ये अशोक सराफ एका इमारतीमधून करड्या रंगाचा कुर्ता आणि धोतर अशा पारंपरिक वेशात बाहेर पडतात आणि तिथेच उभ्या असलेल्या लॅम्बोर्गिनी कारमध्ये जाऊन बसतात. गाडीत बसताना ते आपल्या पायातील चप्पल काढून गाडीत ठेवतात. त्यांचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.
 
हा व्हिडिओ खरा की खोटा?
व्हिडिओची लोकप्रियता वाढल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यातील काही विसंगती हेरल्या. गाडीत बसताना आणि उतरताना पायातील चप्पल बदलते, तसेच बसताना लॅम्बोर्गिनी असलेली गाडी उतरताना फेरारी दिसते. यावरून हा व्हिडिओ प्रत्यक्ष नसून एआय च्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
कलाकार आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया: हा व्हिडिओ पाहून अभिनेता स्वप्निल जोशीने "This Is Lit" अशी कमेंट करत दाद दिली आहे. तर अनेक चाहत्यांनी अशोक सराफ यांना या अवतारात पाहून त्यांच्या प्रसिद्ध 'यदुनाथ जवळकर' या सिनेमातील पात्राची आठवण काढली आहे.
पुढील लेख
ऑस्कर नॉमिनेटेड अभिनेत्रीचे दुःखद निधन; १२ वर्षांपासून आजाराशी झुंज देत होत्या