शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (14:25 IST)

Big Boss Marathi 3 : अभिनेत्री सुरेखा कुडची बिगबॉस च्या घरातून एलिमिनेट झाल्या

या आठवड्यात बिगबॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री सुरेखा कुडची या बाहेर पडल्या. गेल्या आठवड्यात मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा स्पर्धक बाहेर पडला होता. आता या शो मधून अभिनेत्री सुरेखा कुडची बाहेर पडल्या होत्या.अभिनेत्री सुरेखा कुडची या 1990 पासून अभिनयाच्या क्षेत्रात आहे.या उत्कृष्ट अभिनेत्री असून त्यांनी मराठी हिंदी चित्रपटात तसेच अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या त्या स्वाभिमान नावाच्या एका मालिकेत काम करत होत्या. परंतु त्यांना बिगबॉस मराठी 3 मध्ये सहभागी व्हायचे होते म्हणून त्यांनी त्यातून ब्रेक घेतला.
 
बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्या खूप भावुक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की बिगबॉस च्या घरात एक वेगळीच जादू आहे. या घरात जिव्हाळा आपुलकी मिळाले आहे.स्पर्धा म्हणून असे वागणे साहजिक आहे.घरातून बाहेर पडताना रडणार नाही असे ठरवले होते पण भावनांना आवरता आले नाही.