बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (13:55 IST)

Bigg Boss Marathi 3: बिगबॉस मराठीच्या घरात वाद; सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई ' या 'कारणामुळे भिडल्या

बिगबॉस मराठी 3 मधून सुरेखा कुडची या बाहेर पडल्या आहे. आज बिगबॉसच्या घरात सोनाली पाटील आणि केप्टन तृप्ती देसाई मध्ये चांगलीच वादावादी झाली. आणि दोघी आपसात भिडल्या  कारण आहे भात कोणी शिजवावे ? हे कारण होते. सोनालीचं म्हणणं आहे की माझी ड्युटी नसताना मी का करावं ? या कारणामुळे दोघी चांगल्याच तापल्या आणि दोघींचे भांडण झाले. सोनाली चे तृप्तीला म्हणणे आहे की माझी सकाळची ड्युटी नसून मी का करावं ? मला तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाही पण तुम्ही मला बोलू तर द्या, तुम्ही मला बोलूच देत नाही. माझा आवाज चढत आहे मी काही भांडत नाही तुम्ही मला समजून घ्या.सकाळची माझी ड्युटी नाही मी करणार नाही.  तुम्ही छोट्या गोष्टीना का ताणून धरता. का माझ्याशी वाद करत आहात.

यावर तृप्ती देसाई म्हणाल्या की , मी वाद करत नाही आणि भांडण्याच्या तर प्रश्नच नाही सोनाली तुम्ही समजून घ्या. असं म्हणत दोघींमध्ये वाद सुरूच होता.