शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (12:57 IST)

या कलाकाराने घेतला आई कुठे काय करते मधून ब्रेक जाणून घ्या कोण आहे 'हा' कलाकार

फोटो साभार -
सोशल मीडिया सध्या स्टार प्रवाह वरची मालिका आई कुठे काय करते प्रचंड गाजत आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरश: आपल्या मनात स्थान मिळवून दिले आहे .या मालिकेने टीआरपी चे सर्व रेकॉर्ड मोडले असून आपल्या संसारासाठी धपडणारी स्त्री आणि अनुभवी कलाकारांच्या अभिनय, मालिकेच्या उत्कृष्ट कथानकामुळे ही मालिका लोकांच्या घराघरात पोहोचली आहे  या मालिकेत आता नवे वळण येणार असे सांगितले जात आहे या मालिकेतील यश ची भूमिका साकारणारा अभिषेक देशमुख हा मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेण्याचं वृत्त समजलं आहे.यश काही काळासाठी लंडन ला गेला असल्याचे या मालिकेत दाखवणार आहे. या मुळे अभिषेक आता मालिकेतून ब्रेक घेत आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर एअरपोर्ट वर असल्याचे चित्र पोस्ट केले आहे. यश ची भूमिका प्रत्येकाला आवडली आहे. आणि यश सर्वांचा लाडका झाला आहे. त्यामुळे आता यश मालिकेत परत कधी येणार ?येणार की नाही हे येत्या काही दिवसातच समजेल.