सानंदच्या रंगमंचावर 'बोक्या सातबंडे' हे बालनाट्य लहान मुलांसाठी खास ट्रीट
इंदूर- सानंद ट्रस्टच्या फुलोरा उपक्रमांतर्गत 30 जून 2024, रविवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचे बोक्या सातबंडे हे बालनाट्य स्थानिक नाट्यगृह यु. सी. सी. ऑडिटोरियम येथे सायंकाळी 5 वाजता रंगणार आहे.
यावेळी सानंद ट्रस्टचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास कुटुंबळे आणि मानद सचिव श्री. जयंत भिसे यांनी सांगितले की, यावेळी सानंदने फुलोरा उपक्रमातून बच्चा कंपनीसाठी बालनाट्याचे आयोजन केले आहे. पुण्यातील अभिजात क्रिएशन्स या संस्थेने निर्मित केलेले हे नाटक ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित आहे.
बोक्या सातबंडे ही एका खेळकर पण जबाबदार मुलाची कथा आहे, ज्याला वंचितांना मदत करायची आहे आणि खोट्या आणि दिखाऊ लोकांचा पर्दाफाश करायचा आहे. संयम आणि शांत चित्ताने विचार केल्यास मोठ्या समस्याही सोडवता येतात, हाच संदेश बोक्या सातबंडे या बालनाट्याने दिला आहे.
या बालनाट्यात यश शिंदे, सौरभ भिसे, सिद्धा आंधळे, अमृता कुलकर्णी, सागर पवार, प्रफुल्ल कर्णे, आकाश मांजरे, शिवांश, दीप्ती प्रणव जोशी बोक्याच्या भूमिकेत जाहिरात, मालिका आणि सिनेजगतातील प्रसिद्ध बालकलाकार आरुष बेडेकर हे कलाकार आहेत.
नेपथ्य - संदेश बेंद्रे, वेशभूषा - महेश शेरला, रंगभूषा - कमलेश बिचे, प्रकाश योजना - राहुल जोगळेकर, संगीत - निनाद म्हैसाळकर, गीत - वैभव जोशी, नृत्य - संतोष भांगरे, रंगमंच व्यवस्था - निशांत जाधव, किएटिव्ह डायरेक्टर - मिलिंद शिंत्रे, दिग्दर्शक- विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी।
सानंद ट्रस्टचे श्री. कुटुंबळे आणि श्री. भिसे यांनी सांगितले की फुलोरा अंतर्गत रविवार, 30 जून 2024 रोजी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता यु.सी.सी सभागृह, खंडवा रोड, इंदूर येथे नाटकाचा प्रयोग होणार आहे. प्रवेश विनामूल्य असेल आणि सर्व बच्चा कंपनी आणि प्रेक्षकांसाठी खुला असेल.