शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2024 (10:40 IST)

सानंद गोष्ट सांगा स्पर्धेची उपांत्य फेरीची सांगता

इंदूर- संस्कृती जपण्याच्या प्रयत्नांतर्गत आजी-आजोबासाठी गोष्ट सांगा स्पर्धेची उपांत्य फेरी स्थानिक लोकमान्य विद्या निकेतन, लोकमान्य नगर, इंदूर येथे सकाळी 9 ते 12 या वेळेत यशस्वीरित्या पार पडली.
 
सानंद ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्रीनिवास कुटुंबळे आणि मानद सचिव श्री जयंत भिसे यांनी सांगितले की, इंदूर येथे तसेच खंडवा, जबलपूर, मंदसौर, रतलाम, देवास, उज्जैन आदी 55 ठिकाणी झालेल्या सानंद गोष्ट सांगा स्पर्धेत सुमारे 1000 लोकांनी सहभाग घेतला होता. प्रदेशनिहाय गोष्ट सांगा स्पर्धेतील 160 विजेत्यांनी उपांत्य फेरीत 5 गटात सहभाग घेतला.
 
उपांत्य फेरी स्पर्धेच्या परीक्षक होत्या - सौ. सोनाली नरगुंदे, श्री संदीप निरखीवाले, सुश्री वीणा पैठणकर, सौ. वैशाली वाईकर, सौ. भारती पारखी, सौ. स्नेहल जोशी, सौ. शैला आचार्य, श्री प्रवीण कंपलीकर, श्री सतीश मुंगरे आणि सौ. रुपाली बर्वे.
 
उंदीर मामा, टोपी विकाया, शिवाजी महाराज, रामजींची फौज, जिसके लाठी उसकी भैंस, कृष्ण लीला, स्वातंत्र्य संग्राम, लाल परी, आदी प्रेरणादायी घटनांवर आधारित कहाण्या सांगण्यात आल्या.
 
स्पर्धेतील 5 गटातील विजेते - सौ. मधुलिका साकोरीकर, श्री आनंद दाणेकर, सौ. हेमांगी मांजरेकर, श्री विनोद क्षिरे, सौ. सुनेत्रा अंबर्डेकर. द्वितीय- श्रीमती संगीता गोखले, सौ. अनुया चासकर, सौ. प्रतिभा कुरेकर, सौ. शोभना चैतन्य, सौ. आशा कोरडे, तृतीय- सौ. प्राजक्ता मुद्रिस, सौ. पूजा मधुकर, सौ. अपर्णा देव, सौ. दिपाली दाते, श्री शिशिर खर्डेनवीस.
 
विजेत्यांची घोषणा- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेणुका पिंगळे यांनी केले. अतिथी श्री गिरीश सरवटे, श्री विवेक कापरे, सौ. स्नेहल जोशी यांच्या शुभहस्ते विजेत्यांना गौरविण्यात करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत श्रीनिवास कुटूंबळे, जयंत भिसे, किरण मांजरेकर, सौ. स्मिता देशमुख, कु. पुर्वी केळकर यांनी केले. मानद सचिव श्री जयंत भिसे यांनी आभार मानले.
 
सर्व आजी-आजोबा, निर्णायक आणि उपस्थितांनी सानंद न्यासद्वारे गोष्ट सांगा स्पर्धेच्या माध्यमातून लहानपणापासून तरुणांना सुसंस्कृत करण्याच्या या अनोख्या प्रकाराचे पुनरुज्जीवन केल्याबद्दलच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
 
स्पर्धेची अंतिम फेरी 16 जून 2024 रोजी होणार आहे.