सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (12:22 IST)

जोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट' चे पोस्टर लाँच

gat mat poster
प्रेमी जोडप्यांची पहिली भेट घडवून आणणाऱ्या आगामी 'गॅटमॅट' सिनेमाचं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आलं. 'आम्ही जुळवून देतो' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर चित्रपटातील प्रमुख कलाकारांची झलक आपणांस पहायला मिळते. अवधूत गुप्ते ह्यांची प्रस्तुती असलेला यशराज इंडस्ट्रीज निर्मित मराठी चित्रपट 'गॅटमॅट' हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांची निर्मिती आणि निशीथ श्रीवास्तव ह्यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठितील युवा कलाकार आपल्याला पहायला मिळतात.